Share

निर्मलाताई अर्थखातं कसं चालतं याचं अजित दादांकडून मार्गदर्शन घ्या – सुप्रिया सुळे

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भर संसदेत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना खडे बोल सुनावले आहेत. खासदारांचे 12 कोटी मोदी सरकारने परस्पर कापल्यावरुन सुप्रिया सुळे या संसदेत कमालीच्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. तर सीतारमण यांनी अर्थखातं कसं चालत याचे मार्गदर्शन महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून घ्याव असा जोरदार टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

‘मला एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणायची आहे. केंद्रीय आणि महाराष्ट्र कॅबिनेटच्या अर्थमंत्र्यांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी देशातील प्रत्येक खासदाराकडून बारा कोटी रुपये काढून घेतले, तेही त्यांना न विचारता. त्यांनी परस्पर घेऊन टाकले. आता लोक आम्हाला विचारतात, एमपीलॅड फंड द्या, ते तर मोदीजी घेऊन गेले. कुठून देऊ, अडीच वर्ष तर काहीच करता येणार नाही.’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘याच्या अगदी उलट, एकाही आमदाराकडून चारही पक्षांच्या बरं का, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक आमदाराला, अगदी विरोधीपक्षातीलही आमदारालाही दरवर्षी पाच कोटी रुपये मिळतील, हे आमच्या अर्थमंत्र्यांनी सुनिश्चित केलं. हा भारताचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांच्यातील फरक आहे. दोन कोटीही दिले आणि नंतर तीन कोटीही दिले. कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. जीएसटी येत नसतानाही राज्य सरकारकडून चांगली व्यवस्था केली जात आहे.’ याकडे सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधलं.

‘मला वाटतं, तुम्ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून काहीतरी शिकू शकता. त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घेता येईल. लोकांकडून चांगल्या कल्पना घेणं, ही चांगली गोष्ट असते.’ असं सुप्रिया सुळे संसदेत म्हणाल्या.

या प्रकरणावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भगतसिंग कोश्यारींची भूमिका राज्यपालासारखी नाहीय, ते एका पक्षाची भूमिका घेत आहेत. त्यांनी त्यांच्या पदाची गरीमा राखावी, अशी अपेक्षा व्यक्त करत विमान मिळाले नाही यामागे काहीतरी तांत्रिक कारण असावे, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!