🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांचं राज्यात सरकार आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकांमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करणार याविषयाच्या अनेक चर्चा सध्या राज्यात सुरू आहेत. अशातच आज महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवास्थानी जाऊन गणपीतीचं दर्शन घेतलं आहे. या भेटीमुळे मनसे आणि शिंदे गटाच्या युतीबाबत बोललं जात आहे. यावर शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य-
चांगलं आहे. जे शिवसेनेला संपवायला निघाले आहेत ते चेहरे दिसत आहेत. एक एक करुन देत पुढे येत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे नवी मुंबईमध्ये गणपती दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांना पत्रकारांनी मनसे आणि शिंदे गटाच्या युतीबाबत विचारले असता, तेव्हा ते बोलत होते.
गलिच्छ राजकारण मी पाहिलं नाही-
आदित्य ठाकरे यांना दसरा मेळाव्यासंदर्भात विचारले असता, त्यात म्हणणं काय आहे? शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होतो, असं त्यांनी सांगितलं. पुढे ते असंही म्हणाले की, सध्या जे महाराष्ट्रात सुरु आहे कोणालाही पटणारं नाही. याप्रकारचं गलिच्छ राजकारण मी पाहिलं नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.
तसेच, आदित्य ठाकरे यांना ते गणपतीचे दर्शन घेण्यासाठी फिरत आहेत, त्यावेळी कसा प्रतिसाद असतो, हा सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी लहानपणापासून वडिलांसोबत फिरत होतो. शंभरहून अधिक गणपतींचं दर्शन मी घेतलं आहे. आज नवी मुंबईमध्ये आलो आहे दर्शनसाठी. गणपती बाप्पाचं दर्शन आणि जे शिवसैनिक कठीण काळात आमच्यासोबत उभे राहिले त्याचं देखील दर्शन घ्यायला आज मी मुंबईत आलो आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर…”, दसरा मेळाव्या वादात बच्चू कडूंची उडी
- Amit Shah | अमित शहा यांच्या ताफा जाण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेलाही अडवलं, पाहा व्हायरल व्हिडीओ
- Jayant Patil | सेफ्ली पाॅईंटला जयंत पाटलांची सेल्फी घेताना व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
- Devendra Fadnavis | सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे निराश,आशा लोकांवर फार बोलायचं नसतं – देवेंद्र फडणवीस
- Devendra Fadnavis | “आमचं मिशन बारामती नाही तर मिशन इंडिया”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
