Share

दाखले मागणाऱ्यांनी शिकवू नये, आधी बाळासाहेब ठाकरे मोठे की छत्रपती शिवाजी महाराज हे सांगावं – उदयनराजे

Published On: 

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. आम्ही शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील आहोत की नाही हे विचारत दाखले मागणाऱ्यांनी शिकवू नये. त्यांनी आधी बाळासाहेब ठाकरे मोठे की छत्रपती शिवाजी महाराज हे सांगावं, असं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

उदयनराजे भोसले म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पुढेही राहणार आहेत. पण माझा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न आहे, की शिवाजी महाराज मोठे आहेत की बाळासाहेब ठाकरे? हा प्रश्न मला सर्वांनाच विचारायचा आहे. शिवसेना भवनावर महाराजांची प्रतिमा वर पाहिजे आणि मग खाली बाळासाहेब ठाकरे यांची पाहिजे. मग यावर कुणीच आजपर्यंत का आक्षेप घेतला नाही? यावर का कुणी विचारणा केली नाही. जर बाळासाहेब ठाकरे शिवाजी महाराजांपेक्षा मोठे असतील तर त्यांनी शिवसेनेचं नाव बदलून ठाकरे सेना करावं. मी हे द्वेषापोटी म्हणत नसून तार्किक मुद्दा मांडत आहे. त्यामुळे माध्यमांनी जसा मला प्रश्न विचारताय तसा त्यांनाही विचारावा.”

दरम्यान, राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.

‘महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो असतो का ? तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे’

उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.

या वादात शिवसेनेने उडी घेतली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही’. अस ट्विट करत संजय राऊत यांनी भाजप आणि संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावर राज्यात राजकारण पेटलं असताना उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही. अस स्पष्टीकरण उदयनराजेंनी दिले आहे.

तर, सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता तर मी गप्प बसलो असतो का? तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. अस देखील उदयन राजे म्हणाले आहेत. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेबांना विचारा काय झालं अस देखील उदयनराजे भोसले तर व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती अस देखील उदयनराजे भोसले म्हणाले.

नितीन राऊत यांची झाली नाचक्की;वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!