मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद आहेत हे अधोरखित करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर अशासकीय व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या होत्या. नितीन राऊत यांनी कोणाशीही चर्चा न करता परस्पर हा निर्णय घेतल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. एवढचं नाहीतर त्यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांची तक्रार केल्याचं समोर आलं होतं. परंतु, आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, नितीन राऊत यांनी सर्वांना अंधारात ठेवून वीज कंपन्यांवर परस्पर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डींग कंपन्यांवरील १६ सदस्यांचा समावेश होता.
या सगळ्यानंतर काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी नितीन राऊत यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या सदस्यांच्या नियुक्तीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आसीम गुप्ता यांनी मंजुरी दिली नव्हती.
महत्वाच्या बातम्या-
श्रावणात तरी मंदिरं खुली करा, शिवसेना नेते चांद्रकांत खैरेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी
भाजपचे तोंड बंद आंदोलन तर भिडेंकडून अजून सातारा सांगली बंदची हाक नाही, राऊतांचा टोला
सरकारी कोविड सेंटरपेक्षा मराठी शाळांची सुविधा उत्तम; राळेगणसिद्धिच्या ग्रामस्थांची भूमिका !
‘आमच्या रागारगात शिवछत्रपतींचे रक्त, पुन्हा एकदा दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

