Share

Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांनी शिवप्रतापदिनी अनुपस्थित राहण्याचं कारण केलं स्पष्ट, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

Udayanraje Bhosale | मुंबई : प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. मात्र, याच कार्यक्रमाला भाजप (BJP) नेते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अनुपस्थिती लावल्याने एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं होतं. यावर उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मला आमंत्रण नव्हते. फोन देखील आला नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी शिवप्रताप दिनाची तारीख एकच केली पाहिजे. हा वाद मिटवायला हवा. इतकी वर्षे 10 नोव्हेंबर हा दिवस होता. आजचा कार्यक्रम राजकारण होते की नाही यावर बोलणार नाही, असं स्पष्टीकरण उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे.

उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने सर्वांनाच आनंद आहे. त्यांच्यासह सगळेच आनंदी आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

प्रतापगडाच्या संवर्धनासाठी तातडीने २५ कोटी रुपये देण्याचे निर्देश मी दिले आहेत. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मला शिवाजी महाराजांना वंदन करण्याचे भाग्य लाभालं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!