Share

भवानी मातेला उदयनराजे भोसले यांनी घातलं ‘हे’ साकडं

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सवानिमित्त भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावर भवानीमातेची पूजा करण्यात आली.दुष्काळापासून लोकांचं रक्षण करण्यासाठी आपण भवानीमातेला साकडं घातल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं.

दरवर्षी नवरात्रोत्सवात प्रतापगडावर उदयनराजे सहकुटुंब भवानीमातेची पूजा करतात. दरम्यान, उदयनराजेंच्या हस्ते भवानी मातेची आरती घेण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली होती. सकाळी उदयनराजे भोसले हे गडावर आले तेव्हा त्यांचं स्वागत तुतारीच्या निनादात करण्यात आले.

उदयनराजेंच्या हस्ते पूजा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भवानीमातेचं महत्व सांगितलं. दुष्काळापासून लोकांचं रक्षण करण्यासाठी आपण भवानीमातेला साकडं घातल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं. यावेळी उदयनराजेंनी लोकांना दुष्काळापासून वाचायचं असेल तर झाडे लावण्याचाही सल्ला दिला. उदयनराजेंनी हात जोडून विनंती करत, झाडे तोडू नका झाडे जगवा असं आवाहन केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!