टीम महाराष्ट्र देशा- सातार्यातून भाजपच्या तिकीटावर पोटनिवडणूक लढवणारे उदयनराजे भोसले आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका होत असताना उदयनराजेंनी त्या टीकेला चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप उदयनराजे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान उदयनराजेंवर टीका केली होती. आम्ही त्यांच्यासाठी छातीचा कोट केला होता, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले होते. त्याला उदयनराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
https://twitter.com/Chh_Udayanraje/status/1180878876697755649
याविषयी बोलताना उदयनराजेंनी राजकारण-समाजकारण सोडा परंतु जेव्हा आमचा वाढदिवसाचा सर्वपक्षीय कार्यक्रम असतानाही ज्यांनी कट करुन, आमच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केला तो कट, सामान्य जिल्हावासियांनी मात्र जोरदार हाणून पाडला होता. त्यामुळे जिल्हावासियांनी केलेल्या छातीच्या कोटाचे त्यांना निश्चित आश्चर्य वाटणारच असं विधान केले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181563809468567553?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181575778997297152?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

