Share

Uday Samant | “आज आदित्य ठाकरे मंत्र्यांचे राजीनामा मागत आहेत मात्र…”, उदय सामंतांनी दिलं प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

Uday Samant | मुंबई : महाराष्ट्रात महत्वाचा मानला जाणारा तिसरा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत उदय सामंत यांचा राजीनामा मागितला होता. यालाच आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद ही घटनेला आव्हान देणार आहे. त्यांनी फक्त आरोप केले. मात्र, त्या संदर्भात एकही कागद दाखवला नाही, असा टोला लगावत उदय सामंत यांनी कागदपत्र सादर केले आहेत.

आज आदित्य ठाकरे मंत्र्यांचे राजीनामा मागत आहेत मात्र, 2020 मध्ये उद्योग मंत्र्यांनी काय काय केले?, असा सवाल सामंत यांनी केला आहे. एअरबसच्या बाबतीत मविआ सरकार असताना काय बैठका झाल्या होत्या, त्याचे मिनिट्स मागितले होते, पण तसं काही केले नाही. एप्रिल 2020 मध्ये टाटा कंपणीने एअर बससाठी लागणारी जागा विचारली होती. पण मविआने याबाबत कधीच पाठपुरावा केला नसल्याचं देखील सामंत म्हणाले.

दरम्यान, 15 जुलै 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर एकाच महिन्यात 6 बैठाका झाल्या. पण, मविआ काळात हायपॉवर कमिटीची बैठक झाली नाही. तारीख निहाय सर्व कागदपत्रे माझ्याकडे असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.20 ॲाक्टोबरला 25 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प आम्ही राज्यात आणले असून 10 कंपन्यांना कॅबिनेट आणि सब कमिटीची मिटींग घेवून आम्ही मान्यता दिली असल्याचं उदय सामंत म्हणाले. तसेच रायगडला बीडीपीचा प्रकल्प होणार आहे. बीडीपी बाबात गेल्या अडीच वर्षे का होऊ शकला नाही, असा सवाल देखील उदय सामंत यांनी उपस्थित केला अून यावेळी त्यांनी कागदपत्रे देखील दाखवली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!