औरंगाबाद : फायनान्स बचत गटाची वसुली जमा करुन निघालेल्या कर्मचाऱ्याचा तिघा सशंयितांनी पाठलाग करत त्याच्या दुचाकीला आडवे होत त्याच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यास बेदम मारहाण करुन अंदाजे पावणे दोन लाख रुपये लुटल्याचा प्रकार विहामांडवा तुळजापूर ता.पैठण रस्त्यावर घडला आहे. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पैठण येथील भारत फायनान्स कंपनीने महिला बचत गटांना व्यवसायित स्वरुपात कर्ज वाटप केलेले आहे.नेहमीप्रमाणे याची वसुली हप्ता जमा करण्यासाठी फायनान्स कर्मचारी इम्रान लियाकत सय्यद वय( २१) रा. खडकी कोळगत ता.गेवराई जि.बीड हा बुधवारी ता.११ सकाळी विहामांडवा येथे आला होता. त्याने बचत गटाच्या खातेदाराकडून रक्कम जमा करुन आपल्या नविन दुचाकी क्रमांक वरुन विहामांव्याहून तुळजापूरमार्गे पैठणकडे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान, साडेतीन वाजण्याच्या सुमारास तुळजापूर रस्त्यावरील डाव्या कालव्या नजीक येताच पाठीमागून आलेल्या विना क्रमांक लाल रंगाच्या बजाज पल्सर या दुचाकीवरीरुन रुमालाने तोंड झाकलेल्या तिघा संशयितांनी कर्मचाऱ्याची दुचाकी अडविली व काही समजण्या अगोदर त्याच्या डोक्यात लाल मिरचीने भरलेली बियरची बाटली डोक्यावर फोडली व त्यास जबर मारहाण करुन त्यांच्याकडील असलेल्या बँगेत ठेवलेली अंदाजे एक लाख ऐंशी हजार रुपये व काही महत्त्वाची कागादपत्रे हिसकावून लुटून पसार झाले.
लुटारुंनी केलेल्या हल्ल्यात कर्मचारी इम्रान सय्यद हा गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळला त्याचवेळी पाठीमागून स्विफ्ट कार घेऊन आलेल्या राजेंद्र वाकडे यांनी कार थांबवून या घटनेची कल्पना जळपासच्या नागरिकांना दिली. नागरिकांनी लुटारुंचा पाठलाग करुन शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते शहागड मार्गे पसार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्यासह पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पहाणी केली. दरम्यान लूटमार करणाऱ्या दुचाकीवरील तिघांचा नागरिकांनी पाठलाग केले मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाली आहे. भरदिवसा ही लूटमारीची घटना घडल्याने गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रेट भेट! सलमानने शेअर केले मीराबाईसोबतच्या भेटीचे फोटो
- निराशादायक! इस्त्रोची जीएसएलव्ही- एफ १० उपग्रह मोहीम अपयशी
- आयपीएल तयारीसाठी माही चेन्नईच्या कॅम्पमध्ये दाखल, व्हिडीओ व्हायरल
- ऐतिहासिक महेमूद दरवाजा लगतच्या अतिक्रमण धारकांना २४ तासांची मुदत
- मंत्रिमंडळ बैठकीत ठरलं ; राज्यातील हॉटेल्स, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

