Share

‘…गर्जा महाराष्ट्र माझा’ ; मुंबई इंडियन्सने महाराष्ट्र दिनानिमित्त दिल्या खास शुभेच्छा !

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

मात्र, सध्या कोरोनामुळे सर्व नागरिक घरी राहूनच महाराष्ट्र दिन साजरा करत आहेत. अनेक मराठी कलाकार तसेच खेळाडूंनी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यादिवशी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स या टीमने त्यांच्या चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

https://www.instagram.com/p/COUSZVRqAUu/?utm_source=ig_web_copy_link

सोबतच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये झहीर खान, आदित्य तरे, धवल कुलकर्णी, अर्जुन तेंडुलकर मराठीत सवांद साधताना दिसत आहेत. त्यासोबतच चाहत्यांना कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!