बीड: एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, या वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आवश्यक ते सर्व उपाययोजना करत आहे मात्र काही नागरिक तसेच दुकानदार कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करत दुकाने सुरु ठेवत आहेत. यांच्यावर शुक्रवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना तसेच प्रयत्न करत आहे. कडक निर्बंधांसह संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर तहसीलदार व नगर पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचारी शुक्रवारी रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, नेमण्यात आलेल्या पथकाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध भागातील २० दुकानदारांवर कारवाई करत ३९ हजार ६०० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
संचारबंदी लागू करण्यात आली असून तरी देखील व्यापारी मागच्या दारातून विक्री करत असल्याने नागरिक देखील खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. शनिवारी देखील शहरात तपासणी मोहीम राबवून २० दुकान मालकांवर कारवाई करून ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला. एकूण २० जणांना ३९ हजार ६०० रुपयांचा दंड आकारला. या पुढेही कारवाई सुरूच राहील, असे तहसीलदार वमने व मुख्याधिकारी डॉ. गुट्टेंनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- जून्या भांडणाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला
- एका लग्नाची अशीही गोष्ट! विवाहाच्या रात्रीच करवलीसह नवरी फरार
- माजलगावात व्यापाऱ्यांचा ‘उघडझाप’ कार्यक्रम
- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा – अजित पवार
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात शिखर धवनने ‘Mission Oxygen’साठी केली २० लाखांची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

