Share

शेतात टाकला होता बनावट नोटांचा छापखाना; वर्षभर नोटा खपवल्या, मात्र…

Published On: 

कोल्हापूर – दोन हजारांच्या बनावट नोटा तयार करून बँकेत भरणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत हळदकर आणि उत्तम पवार अशी संशयितांची नावं असून त्यांनी कम्प्युटर, प्रिंटरच्या सहाय्याने एकाच सिरीयलच्या बनावट नोटा बनवल्या. राष्ट्रीयकृत बँकेत भरणा केलेल्या 67 पैकी तब्बल 17 नोटा निघाल्या बनावट . संशयितांनी आणखी काही बनावट नोटा बाजारात खपवल्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथे उत्तम पवार यांच्या शेतात बनावट नोटा छापण्यात येत होत्या. ते खपवण्याचे काम हळदकर करत होता. चार दिवसापूर्वी हळदकर याने राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दोन हजारांच्या ६७ नोटा जमा केल्या. बँकेतील कॅशियरने त्या नोटा जमा करून घेतल्या. नंतर या नोटा इतर खातेदारास दिल्यानंतर त्याला नोटा घेताना शंका आली. त्यामुळे त्याने कॅशियरला याबाबत माहिती दिली. ६७ नोटांमध्ये सतरा नोटा या एकाच सिरीयल क्रमांकाच्या होत्या.

बँकेच्या अधिकाऱ्यांनी अनिकेतला फोन करून बँकेत बोलवून घेतल्यानंतर त्याला बँकेत जमा केलेल्या नोटा बनावट असल्याचे सांगितले. ते त्याने मान्य केले. तशी याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलिसांना दिली. त्यापूर्वी अनिकेत तेथून गायब झाला. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री (५) अटक केली.

चौकशीत त्याला या नोटा संशयित उत्तम पोवारने खपवण्यासाठी दिल्या असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने संशयित उत्तमचा शोध घेऊन त्यालाही मध्यरात्री अटक केली. तशी राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली. संशयितांनी यापूर्वी आणखी किती बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न केला आहे का? याची माहिती पोलिस घेत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक दिपीका जोंजाळ यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी समीर शेख, रंगराव चव्हाण, विशाल शिरगावकर, सत्यजित सावंत, संदीप सावंत, युक्ती ठोंबरे आणि सायबर सेलचे सचिन बेंडखळे यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!