Share

मोदींविरोधात ट्विट करणे पडले महागात

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ट्विट करणे एका पायलटला चांगलंच महागात पडलं आहे. या पायलटला विमान कंपनीनं निलंबित केलं आहे. निलंबित करण्यात आलेल्या पायलटनं यापूर्वी हवाई दलामध्येही काम केले होते.

‘गो एअर’ विमान कंपनीतील पायलट मिक्की मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यांच्या या ट्विट्सची कंपनीनी तातडीनं दखल घेत शनिवारी त्यांना नोकरीवरुन निलंबित केलं आहे. ‘गो एअर एअरलाईन्स या प्रकराच्या कोणत्याही गोष्टी कधीही खपवून घेणार नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नोकरीचे नियम, तसंच नीतीदर्शक तत्वांचं पालन करणे अनिवार्य आहे. सोशल मीडियावरील८९ वर्तनाचाही यामध्ये समावेश आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा एअरलाईन्सशी कोणताही संबंध नाही’ असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या प्रकरणानं वेगळं वळण घेतल्यानंतर कॅप्टन मलिक यांनी माफी मागितली आहे.”माझ्या ट्विट्सचा कंपनीशी कोणताही संबंध नव्हता. ते संपूर्णपणे माझे वैयक्तिक विचार होते. मी या कृतीची जबाबदारी घेतो. त्याचबरोबर या प्रकरणामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांची माफी मागतो” असं मलिक यांनी स्ष्ट केलं आहे.

या प्रकरणात कंपनीनं केलेली कारवाई मान्य असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मलिक यांनी मोदींवर टीका करणारे आक्षेपार्ह ट्विट्स काढून टाकले असून ट्विटर अकांऊट बंद केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!