नागपूर : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात (८.३३ टक्के) पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आहे. दुसरीकडे मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे.
तसेच बुधवारी नागपूरमध्ये देखील पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत कठोर नियमावली जारी केली आहे.
कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्काराची नियमावली काय?
मृतदेहाला कुणीही स्पर्श करु नये. मृतदेहावर अंत्यविधी करताना 5 पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये. संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी.
दरम्यान, मृतदेहाला कुणी स्पर्श करणार नाही आणि अंत्यविधीला पाचपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत, याची खातरजमा झाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करणे.अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.

