मुंबई : एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी मुंबई – गोवा क्रूझवर कारवाई करुन काही लोकांना अटक केली होती. यामध्ये बॉलिवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला अटक करण्यात आली. आर्यनचा जामीन अर्ज न्यायाल्याकडून फेटाळण्यात आला. मात्र आता ड्रग्ज प्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी यासंबंधी मोठे भाष्य केल आहे.
भारतीय कुटुंबव्यवस्थेचं महत्त्व समजावून सांगताना मोहन भागवत यांनी सांगितले की, “लोकांना आपलं गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवलं. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केलं. आपल्या देशातही हेच सुरु आहे. ड्रग्ज प्रकरणं पाहता ते कुठून येतात हे पाहिलंत तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल,” यावेळी पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा अभ्यास करत होते. तसंच ही मूल्यं नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, क्रुझवर ड्रग्स पार्टीमधील एनसीबीच्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणा राजकीय स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ एकत्र या’, यशोमती ठाकूर यांचे आवाहन
- ‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला
- ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान राज्यभरातील एसटी सेवा सुरू राहणार, महामंडळाचा निर्णय
- ‘शेतकऱ्यांनी वरुण गांधींचे अभिनंदन करायला हवे’, संजय राऊतांनी केले कौतूक
- ‘अन्नदात्यांचे ऋण फेडण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा’, शिवसेनेचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
