मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेशी सवांद साधत आहेत. मुख्यमंत्री आज लॉकडाऊन करणार का ? असा प्रश्न आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला होता. यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या संबोधनाच्या सुरुवातीलाच घाबरू नका, मी तुम्हाला घाबरवायला नाही आलो नाही असे उद्गार काढले आहेत.
मात्र या भाषणावरून , भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. यावेळी त्यांनी बेल्जियमचे उदाहरण देत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ‘बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय… पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय… पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे… पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले…’ असे फडणवीस आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहेत.
पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे ….आपले केंद्र सरकार काय देणार …अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही … बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून @Dev_Fadnavis https://t.co/QH60dZJHLn
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2021
दरम्यान फडणवीसांच्या या टीकेला गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिल आहे. युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच जनेताला काही ना काही दिलंय. अस फडणवीस म्हटल्यानंतर, ‘पण हे सगळे तिथल्या केंद्र सरकारनी केले आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही, बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून.., असा टोला आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला आहे.’
महत्वाच्या बातम्या
- आरोग्य सुविधा उभ्या करू पण डॉक्टर नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे ?
- खळबळजनक! पॉझिटिव्ह रुग्ण थेट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात
- विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने का केले होते मुंडन ? संघ व्यवस्थापकाने दिले ‘हे’ उत्तर
- देशात कोरोनाचा विस्फोट; कालची आकडेवारी पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात
- ‘आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट चालू असताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांची योजना आखू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

