Share

‘मंत्र्यांना अडवायचा प्रयत्न करून बघा’, शिवसेनेचे भाजपाला प्रतिआव्हान

Published On: 

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा नाही, यावर्षीचा अग्रिमही नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आणि तीन आमदार असताना शिवसेनेने केले काय, असा प्रश्न उपस्थित करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, तुळजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार कैलास पाटील यांनी केवळ रस्ता अडवायचा प्रयत्न तर करून पाहा, असे थेट आव्हान देत भाजपाचे मोदी शेतकरी विरोधी असल्याचा दावा केला आहे. शिवसेना आमदार कैलास पाटील म्हणाले की, ‘भाजपचे केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे सिध्द होत असल्याचे लक्षात येऊ लागल्यावर पत्रक काढुन शिवसेनेवर आरोप करण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न आहे. शिवसेनेला हिशोब मागायची किमान तुमच्यात नैतिकता उरली नाही.’

‘तुमच्या ४० वर्षाच्या कारभाराचाही लेखाजोखा मांडलात तर जनतेलाही बर वाटेल. जिल्ह्यात ४० वर्षात विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचे काम शिवसेनेच्या फक्त दोन वर्षाच्या सत्तेत होत आहे, याचा तुम्हाला पोटशुळ सुटला आहे. शिवसेनेच्या मंत्र्याचा रस्ता आडवायचा नुसता प्रयत्न तरी करुन बघा, मग समजेल पत्रक काढण्याइतक ते सोप आहे का’, असेही प्रतिआव्हान त्यांनी पत्रकात आमदार राणा पाटील यांना दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!