नवी दिल्ली : टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीला सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. प्रकरणात रिपब्लिक टीव्हीने मुंबई पोलिसांविरोधात याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. तर रिपब्लिक टीव्हीला मुंबई हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे. टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या चौकशीला रिपब्लिकचा विरोध आहे आता कोर्टानेच विरोध धुडकावला आहे.
बनावट टीआरपी रँकिंग मिळवून त्याच्या आधारे जाहिराती मिळविण्यासाठी वृत्तवाहिन्यांना मदत करणाºया रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. याबाबत रिपब्लिकसह अन्य दोन लहान टीव्ही चॅनेलवरही गुन्हा दाखल केला आहे.
टीआरपी म्हणजे काय?
टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंना भेटताच ग्रंथालये झाली सुरु,अवघ्या 7 दिवसात राज्य सरकारला घ्यावा लागला निर्णय
- सुशांतचा ‘केदारनाथ’ पुनर्प्रदर्शनावर चाहत्यांचा विरोध
- मेरे पास ना घर ना द्वार, फिर क्या उखाडेगी बुल्डोजर सरकार – अमृता फडणवीस
- जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
- स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग करण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
