🕒 1 min read
मुंबई : रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ अनेकदा वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या सेटवर किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार आले होते. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच यातील स्पर्धकांमुळे ही चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा या शोची चर्चा सुरू झाली असून, या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेल्या नेहा कक्करची बहीण सोनू कक्करची सध्या तिने गायलेल्या गाण्यावरून ही चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/p/CP-mpZjh-yp/?utm_source=ig_web_copy_link
गेस्ट म्हणून आलेल्या सोनू कक्करने गायलेल्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट होताच सोनूला नेटकऱ्यांनी चांगलचं ट्रोल केल आहे. इंडियन आयडलच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांनी सोनूला गाणं गाण्याची विनंती केली. त्यानंतर सोनू कक्करने नुसरत फतेह अली खान यांचं लोकप्रिय ठरलेलं “मेरे रश्के कमर” गाणं गायलं. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आणि यावर अनेक कमेंट्स येऊ लागल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांना सोनूने गायलेलं हे गाणं आवडल नाही. त्यामुळे सोनूवर ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे.
सोशल मिडीयावर सोनू कक्करचं गाणं ऐकून एक नेटकरी म्हणाला की, ‘यापेक्षा ओरिजनल गाणं वाजवल असतं तर बरं झालं असतं.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला की, ‘गाण्याची चांगलीच इज्जत काढली. नुसरत साहेबांच्या आत्म्याला रडू आलं असेल, त्यांचा आत्मा दुखावला गेला असेल.’ अशा कमेंट करत लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘इंडियन आयडल १२’ हा रिअॅलिटी शो हल्ली टीआरपीसाठी काय करेल याचा नेम नाही. या शोच्या टीआरपीसाठी सुरु असलेले एकापेक्षा एक ड्रामे पाहून लोक संतापले आहेत. त्यामुळे यातील काही स्पर्धकांना बाहेर काढण्याची मागणी देखील होत आहे. त्यातच आता सोनुमुळे या शोची चर्चा रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारचा निर्णय दारू विक्रेत्यांसाठी’, चंद्रपूर दारूबंदी उठवण्याचा ५०० गावांकडून निषेध
- ‘मला माहित आहे की तु माझ्यासोबत आहे…’; अंकिताची भावूक पोस्ट
- जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना आश्वासनाखेरीज सरकारने काहीही दिले नाही
- वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू – हसन मुश्रीफ
- ‘अहंकार जोपासण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट व जनतेचे हाल हेच वसुली सरकार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
