टीम महाराष्ट्र देशा : देशाचे महत्वपूर्ण मानले जाणारे तिहेरी तलाक विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे. त्यामुळे लोकसभेत तीन वेळा मंजूर झालेले विधेयक देशाच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत टिकणार का ? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
राज्यसभेत भाजप पक्षाला बहुमत नसल्याने विधेयक पारित होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे लोकसभेत मंजूर झालेले विधेयक राज्यसभेत रखडले आहे. विधेयकाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांची संख्या ही समर्थनात मतदान करणाऱ्यांच्या संख्ये पेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत नामंजूर होणार असल्याचं दिसत आहे.

तिहेरी तलाक विधेयक हे मोदी सरकारचे महत्वपूर्ण विधेयक मानले जाते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देखील तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा करण्यात आली. मात्र राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळत नसल्याने आतापर्यंत हे विधेयक रखडले आहे.
दरम्यान राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्यासाठी 121 मतांची गरज आहे. राज्यसभेत वायएसआर काँग्रेसकडे 2, जेडीयू 6 आणि एआयएडीएमके यांच्याकडे 13 खासदारांचे संख्याबळ आहे. मात्र हे तिन्ही पक्ष विधेयकावर मतदान करणार नाहीत. तर तेलंगणा राष्ट्र समिती या मतदानात करणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. तर भाजपकडे स्वतः चे 78 आणि समर्थनातील पक्ष मिळून 108 एवढे मतदान आहे.
महिला असूनही निव्वळ राजकारणासाठी तिहेरी तलाकला विरोध केला, भाजपचा सोनिया गांधींवर आरोप
‘ट्रिपल तलाक’ला तलाक ; ‘ट्रिपल तलाक’विरोधी विधेयक लोकसभेत मंजूर

