Share

ग्रामपंचायत निवडणुका खुल्या वातावरणात पार पाडा; जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना आदेश 

Published On: 

🕒 1 min read

बीड  :-  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता अमलात आलेली आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्हयातील 129 ग्रामपंचायतीसाठी दि. 15 जानेवारी 2021 शुक्रवार रोजी सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी दि. 18 जानेवारी 2021 सोमवार रोजी होणार आहे.निवडणुका व मतमोजणी खुल्या वातावरणात पार पाडाव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी जारी केले आहे.

निवडणूक कालावधीत कार्यवाही तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न उदभवू नये यासाठी यासाठी सर्व संबधित अधिकारी यांना आदेश जारी करण्यात आले आहेत.एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणा-या व नव्याने स्थापित होणा-या 129 ग्रामपंचयातीच्या सार्वत्रिक निवडणूकाकरिता संगणकीकृत पदध्तीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे.निवडून आलेल्या सदस्यांची नावे दि. 21 जानेवारी 2021 गुरुवार रोजी प्रसिध्द करण्यात येतील.

त्या आदेशानुसार तरतुदी मध्ये निवडणूका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दुष्टीने लोकसभा निवडणूकांच्या वेळी ज्या प्रमाणे कार्यवाही केली जाते . त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या वेळी सर्व आवश्यक बाबींवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या इमारती गळणार नाहीत व मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदान पथकास कुठल्याही कारणामुळे अडचण येणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे राहील. मतदान केंद्र व मतमोजणीच्या वेळी पुरेसा बंदोबस्त व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची , निवडणूक असलेल्या ठिकाणी आचारसंहितेची अंमलबजावणी पथकाची स्थापना, तालुक्यातील आचारसंहिता अंमलबजावणी कक्षाची स्थापना तसेच आचारसंहिता तसेच आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दैनंदीन अहवाल पाठविणे .

मतदानाच्या आदल्या दिवशी व मतदानाशिवाय मातमोजणीच्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत राहील यासह मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व दारु विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवणे, मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्यात येतील याबाबत सूचीत केले आहे.यासह निवडणूका पार पाडताना कोविड 19 च्या अनुषंगाने परिस्थितीत योग्य काळजी व खबरदारी घेतली जावी असे या आदेशात जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे.

निवडणूक लढवणा-या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भरल्यापासून होणा-या दैनिक खर्चाची माहिती संबंधित तहसील कार्यालयातील खर्च तपासणा-या पथकास सादर करणे जरुरीचे आहे. तसेच मतमोजणी संपल्यानंतर पुढील 30 दिवसाच्या आत खर्चाचा विहित शपथपत्रासहित सादर करण्याची व तसेच मुदतीत खर्च सादर जबाबदारी संबंधित उमेदवार यांची आहे. यासह विविध सूचना या आदेशानुसार देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!