मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात महाराष्ट्र राज्य ऊर्जा कंपनीत व्यवस्थापकीय संचालक असलेल्या ए. शैला यांची व्यवस्थापकीय संचालक हाफकीन मुंबई येथे नियुक्ती केली असून याठिकाणी नियुक्ती झालेलेले कुणाल खेमनार यांच्या आदेशात अंशतः बदल करुन त्यांना पुणे मनपा येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती दिली आहे.
विलास पाटील उर्वरित महाराष्ट्र मंडळाच्या सदस्य सचिव पदावरुन सचिव अन्न व पुरवठा विभाग तर कौस्तुभ दिवेगावकर संचालक भूजल सर्वेक्षण यांची उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांची अचानक बदली करण्यात आल्याने या मागे काय कारण आहे या बाबतीत अनेक तर्क विर्तक काढले जात आहे नुतन जिल्हाधिकारी कौस्तुभदिवेगावकर हे मराठवाडातील असुन त्यांनी या पुर्वी लातूर महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून काम केल्याचे कळते .
महत्वाच्या बातम्या-
अजब सरकार गजब निर्णय, शौमिका महाडिकांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा
गेल्या २४ तासांत देशभरातील कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक
‘ती’ नावे लवकरच जाहीर करतो, निलेश राणेंचा खळबळजनक दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

