Share

‘मी तर पहिल्यापासूनच म्हणतोय की चिक्की घोटाळ्यातील दोषींवर गुन्हे दाखल करा’, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : भाजप नेत्या तथा तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एकात्मिक बाल योजनेअंतर्गत मुलांना निकृष्ट दर्जाच्या चिक्कीचे वाटप करणाऱ्या खासगी पुरवठादारांवर अद्याप गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.

उच्च न्यायालयाच्या या सुनावणीनंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. चिक्की घोटाळ्यात दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची माझी पहिल्यापासून मागणी आहे, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिक्की प्रकरण गाजलं होतं. तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप करत, आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले, असा घणाघाती आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पंकजा मुंडे या महिला आणि बालविकास मंत्री होत्या. त्यामुळे त्यांच्या खात्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण कोर्टात गेलं असून आता हायकोर्टाने प्रश्न उपस्थित करत, भाजप सरकारच्या काळातील कथित चिक्की घोटाळा पुन्हा मान वर काढत आहे.

कथित चिक्की घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात सन २०१५ मध्ये काही जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर बऱ्याच महिन्यांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी लहान मुलांना निकृष्ट दर्जाची चिक्की देण्यात आली. त्यासाठी नियम डावलून २४ कोटींची कंत्राटे देण्यात आली होती. त्या चिक्कीचे नमुने प्रयोगशाळेत चाचणीसाठी देण्यात आल्यानंतर त्यात माती, वाळू आढळल्याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच सन २०१५ मध्ये याप्रकरणी अंतरिम आदेश देताना या संदर्भातील सर्व करारांना तसेच पुरवठादारांच्या देयकांनाही स्थगिती देण्यात आली असल्याचेही न्यायालयाला यावेळी सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!