कणकवली:- गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ जानेवारी रोजी होणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच या विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेतून कुणी केलेली नाही तर ही मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नितेश राणे यांनी आधी ट्वीटद्वारे आणि नंतर प्रत्यक्ष माध्यमांशी बोलतानाही या मागणीचा पुनरूच्चार केला.
दरम्यान, ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला. त्यांनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. तसेच बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार गद्दारांना नाही अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असतानाच खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता नितेश राणे करत असलेली मागणी केवळ प्रसिद्धीसाठीच आहे, असे नाईक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- अनुसुचित जाती जमातींच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – बाळासाहेब थोरात
- केंद्र सरकारने मका आणि बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी – छगन भुजबळ
- कांजूरमार्गच्या जागेसाठी राज्य सरकारने आक्रस्ताळेपणा करू नये – रामदास आठवले
- मोतीलाल व्होरा यांच्या निधनाने अत्यंत निष्ठावान व अनुभवी नेतृत्व हरपले – बाळासाहेब थोरात
- शालेय खेळाडूंसाठी गोल्फ मैदान विकसित करा – सुनील केदार


