Share

पुरंदरमध्ये होणार पारंपारिक लढत, संजय जगतापांसमोर शिवतारेंचे आव्हान

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरवात केली आहे. त्याप्रमाणे पुरंदर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पारंपारिक लढत पाहिला मिळणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांना रविवारीचं पक्षाकडून ABफॉर्म देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस आघाडीकडून संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यावेळेस ही पुरंदरमध्ये शिवतारे विरुद्ध जगताप अशी मुख्य लढत पाहिला मिळणार आहे.

पुरंदर विधनासभा मतदारसंघासाठी कॉंग्रेस आघाडी कोणाला तिकीट देणार याबाबत सुरवातील काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संभाजी झेंडे यांनी पुरंदरच्या जागेवर हक्क सांगितला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळत पुरंदरची जागा कॉंग्रेसला सोडली आणि उमेदवारी संजय जगताप यांना जाहीर झाली. असे असले तरी संजय जगताप यांना ही निवडणूक काहीशी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इच्छुक असलेले संभाजी झेंडे हे अपक्ष उभ राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उत्तर पुरंदरमधून संजय जगताप यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे गेली दहा वर्ष विजय शिवतारे हे पुरंदर तालुक्याचे आमदार आहेत. तर फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळात विजय शिवतारे हे राज्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे या निवडणुकीला विजय शिवतारे यांना आपली प्रतिष्ठा जपण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कारण संजय जगताप यांनी निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात नव्याने निर्माण केलेला जनसंपर्क हा शिवतारे यांना आव्हानात्मक ठरणारा आहे. मात्र विजय शिवतारे यांनी देखील आपल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात गाव पातळीवर पक्षभेद न करता मोठी विकासकामे केली आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील अनेक कॉंग्रेस नेत्यांनी पारंपारिक पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मतदारसंघात एका बाजूला शिवतारे यांचा शाश्वत विकास आणि दुसऱ्या बाजूला संजय जगताप यांचा दांडगा जनसंपर्क असल्याचं पाहिला मिळत आहे.

दरम्यान निवडणुकीच्या तोंडावरचं तालुक्यातील राजकीय समीकरण आता बदलत असल्याच दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कट्टर समर्थक आणि शरद पवार यांचे विश्वासू जालिंदर कामठे यांनी ऐन निवडणुकीच्या काळातचं भाजपात प्रवेश केला आहे. जालिंदर कामठे यांना आता मतदारसंघात युतीचा धर्म पाळत विजय शिवतारे यांना पाठींबा द्यावा लगणार आहे. त्यामुळे कामठेंच्या पक्षांतराचा मोठा फटका कॉंग्रेसला आघाडीला बसणार आहे. असे सगळे धोके आणि आव्हानांचा सामना करत संजय जगताप आपल्या अपयशी रथ रोखणार की विजय शिवतारे हे आमदारकीची हॅट्रीक मारणार का हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1178605787062493184?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178605416730595329?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1178605143652065281?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!