Share

‘करोना वॅक्सीन टुरिझम’ ! टूर कंपनीने दिली पर्यटकांना अनोखी ऑफर

Published On: 

🕒 1 min read

न्यूयॉर्क: करोनाच्या थैमानामुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. यादरम्यान अनेक देशांमध्ये संशोधकांकडून लस उपलब्ध झाल्याचा दावा करण्यात येत आहे मात्र सामान्यांपर्यंत ही लस पोचणार कधी हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे करोनाला अटकाव करणारी लस विकसित झाल्यास आपल्याला पहिल्यांदा लस मिळाली पाहिजे असे अनेकांची इच्छा आहे.

अमेरिकेत डिसेंबरमध्ये लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैसे मोजण्याची तयारी असणाऱ्यांसाठी एका टूर अॅण्ड ट्रॅव्हलस् कंपनीने खास वॅक्सिन टूरझिम पॅकेज जाहीर केले आहे. या टूर अॅण्ड ट्रॅव्हलस् कंपनीने एका व्हॉट्स अॅप मेसेजद्वारे ग्राहकांना आवाहन केले असल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. अमेरिकेत फायजरची लस ११ डिसेंबरपासून उपलब्ध होण्याची शक्यता आहे. काही मोजक्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आम्ही ही लस देणार असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. मेसेजमध्ये या वॅक्सिन टुरिझम पॅकेजची किंमतही देण्यात आली आहे.

या वॅक्सिन टुरिझम पॅकेजची किंमत एक लाख ७४ हजार ९९९ इतकी आहे. यामध्ये मुंबई-न्यूयॉर्क-मुंबई विमान प्रवास, तीन दिवस/चार रात्र वास्तव्य आणि लस किंमतींचा समावेश आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या पॅकेजची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये फक्त नाव नोंदणी करायची असून ई-मेल, मोबाइल क्रमांक, वय, पासपोर्टची प्रत आदी बाबी या टुरिस्ट कंपनीकडे सोपवायची आहे.

आम्ही कोणतीही लस खरेदी करणार नसून सर्व प्रक्रिया अमेरिकेच्या कायद्यानुसार पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. लस कधी देण्यात येईल याची निश्चित तारीख सांगता येणार नाही. मात्र, सध्या फक्त इच्छुकांची माहिती जमा केली जात आहे. जेणेकरून वेळेप्रसंगी प्रवाशांची माहिती जमा करण्यातच वेळ वाया जाणार नाही.

दरम्यान, अमेरिकेत ११ किंवा १२ डिसेंबरपासून लशीकरण मोहिमेस सुरुवात होईल, असे व्हाइट हाउसच्यावतीने सांगण्यात आले. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या लशीबाबतच्या समितीची १० डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. अमेरिकेतील करोनाविषाणू लशीकरण मोहिमेचे प्रमुख डॉक्टर मोनसेफ स्लाउ यांनी सांगितले की, लशीकरणास मंजुरी मिळाल्यानंतर २४ तासांमध्ये लशीकरण केंद्रापर्यंत लस वितरीत करावी लागणार आहे. त्यामुळेच १० डिसेंबरच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यास दोन दिवसांमध्ये ११ अथवा १२ डिसेंबर रोजी लशीकरण कार्यक्रम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!