Share

धक्कादायक : सांगली जिल्ह्यात ‘कोरोना’चे चार नवे रूग्ण

Published On: 

मुंबई : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना’ चे चार रूग्ण सांगलीत आढळले आहेत. कोरोना’ बाधित चौघे रूग्ण इस्लामपूरचे असून नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले आहेत. चौघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह’ आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातून चार प्रवासी सौदी अरेबिया येथे उमराह देवदर्शनासाठी गेले होते. हे चौघे नुकत्याच प्रवास करून परतले होते. त्यांचे रिपोर्ट आज जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून, या चारही प्रवाशांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

संबंधित कोरोना बाधित रुग्णांना सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. त्या चौघांचे कोरोना अहवाल मंगळवारी आले असून ते चौघेही कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, ‘तपासणीच्या अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!