Share

#लढाकोरोनाविरोधातील : ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या ४० टक्क्यांनी घटली

Published On: 

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3320 वर पोहोचली आहे. राज्यात काल दिवसभरात 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 331 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तसेच सध्या देशात कोरोना’ला रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि चाचण्यांची संख्या वाढल्याचा चांगला परिणाम दिसून येत असून, देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत तब्बल 40 टक्क्यांनी घट झाली आहे. देशवासियांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील कोरोना संसर्गाबाबत माहिती दिली. यावेळी ‘आयसीएमआर’चे संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर हे उपस्थित होते

दरम्यान, रुग्णांची संख्या दुप्पट वाढण्याचा कालावधीही लांबला आहे. तसेच 80 टक्के रुग्ण बरे होत आहेत. लॉकडाऊन आणि चाचण्यांचे प्रमाण वाढल्यामुळे देशभरात रुग्णांची संख्या 40 टक्क्यांनी कमी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर 80:20 असा आहे. म्हणजे 80 टक्के रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त होत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!