Share

चिंतेत वाढ : राज्यातील एकूण ‘कोरोना’ रुग्णांची संख्या 1574 वर

Published On: 

मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोनाच संकट गहिरं होत आहे. कोरोना आता गुणाकार करण्याच्या स्थितीत असून आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत आहे.

तसेच काल कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर पोहचली आहे. याचप्रमाणे सध्या राज्यात 1176 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत एकूण 188 कोरोना रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या राज्यात 38 हजार 927 व्यक्ती घरगुती विलगीकरणात आहेत, तर 4738 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!