🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारताच्या राजनैतिक रणनीतीला मोठा विजय झाल्याचे मानले जात आहे. फ्रान्सने हा हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला चीनने विरोध केला होता. पण त्यानंतर चीनने हा विरोध कमी केला होता. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या निर्णयाला 151 देशांनी पाठिंबा दिला आहे.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तसेच पुलवामा हल्ल्यामागे देखील अजहरचा हात होता. विशेष म्हणजे इतके दिवस या बाबत चीनने नकाधिकार वापरला होता. मात्र भारताच्या राजनैतिक रणनीताला मोठे यश मिळाले आहे. चीनने याबाबतचा आपला विरोध मागे घेतला आहे. आता अजहर बाबत पाकिस्तान कोणता निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागेल. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याने त्याची सर्व संपत्ती जप्त केली जाईल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
