मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सोमवारी कोल्हापुरात येत आहेत. सोमय्या यांनी घोरपडे कारखान्यासह कागल मतदारसंघात काही ठिकाणीही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपला दौरा जाहीर केल्यानंतर काही वेळातच किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदेश दिल्याचा सनसनाटी आरोप सोमय्या यांनी केलाय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आपल्या मुंबईतील घराबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आल्याचा दावा सोमय्यांनी केला. पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापूरात येण्यापासून प्रतिबंधित करणारी नोटीस दिली आहे. त्यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
‘मी अजून कोल्हापूरात गेलोच नाहीये. तर मला माझ्या घरात घुसून तुम्ही नोटीस देऊच कशी शकता? ठाकरे-पवार एवढे घाबरले आहेत का? मुश्रिफांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी मी कोल्हापूरला दौरा करणार होतो. पण पवार एवढे घाबरले आहेत की, त्यांनी माझ्या अटकेचे आदेश दिले आहेत. तरीही मी कोल्हापूर दौऱ्यावर ठाम असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितले.
‘गृहमंत्र्यांनी हा आदेश दिलाय की, कोल्हापूरला येऊ नयेत. कारण ते आले तर ते हा घोटाळा बाहेर काढतील आणि अनिल देशमुखांनंतर त्यांनाही चौकशीचा ससेमिरा लागून जेलमध्ये जावं लागणार. हसन मुश्रिफांनी अनेक घोटाळे केले आहेत. त्यांचे तीन घोटाळे माझ्या हातात आहेत. सरकार घाबरले आहे. म्हणूनच ते माझी अटक करत आहेत. पण ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांना आम्ही जेलमध्ये पाठवूच. मी आता उद्या सकाळी कोल्हापूरला जाईन. अंबेमातेचं दर्शन घेऊन कागलला कारखान्यात जाऊन घोटाळा बाहेर काढेनच. कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी मी थांबणार नाही’ असे आव्हान सोमय्या यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- मुंबई ATS अॅक्शन मोडमध्ये; बॉम्बस्फोटाचं प्लॅनिंग करणाऱ्या ‘मुन्ना भाई’ला मुंब्रातून अटक
- ओला ई-स्कूटरची दोन दिवसात तब्बल ११०० कोटींची विक्री
- पाकिस्तानी खेळाडूच्या ‘त्या’ ट्विटवर किवी क्रिकेटपटूचे चोख प्रत्युत्तर
- इव्हेंट खत्म; एकाच दिवशी अडीच कोटी लोकांच्या लसीकरणावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा


