टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरु आहे. संपूर्ण राज्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे ३ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याविषयी त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास आणि स्वप्न घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवत आहे. गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी १ वाजता आपणा सर्वांच्या साक्षीने मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता भव्य सभेचे आयोजन मोंढा मैदान येथे करण्यात आले आहे. मला आशीर्वाद, शक्ती द्यायला नक्की या! असं ट्वीट केले आहे.
परळी मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास आणि स्वप्न घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांच्या वतीने विधानसभा निवडणूक लढवत आहे. गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी १ वा. आपणा सर्वांच्या साक्षीने मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मला आशीर्वाद, शक्ती द्यायला नक्की या! pic.twitter.com/jWMwzYaen9
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 2, 2019
दरम्यान, परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा सामना हा भाजपच्या पंकजा मुंडेंशी होत आहे. २००९ आणि २०१४ साली पंकजा यांनी परळीतून धनंजय यांचा पराभव केला होता. त्याचीच पुनरावृत्ती यावेळी त्या करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर धनंजय मुंडे हे मागील निवडणुकांमधील अपयश धुवून टाकण्याचा प्रयत्न करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1179247465444380673?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1179282611967053824?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

