Share

टोकियो ऑलिम्पिक! भारतीय खेळाडुंशी पंतप्रधान मोदींचा संवाद

Published On: 

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला केवळ १० दिवसाचा अवधी बाकी आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमिवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंसोबत संवाद साधला.

यावेळी संवाद साधताना पंतप्रधान मोदीनी खेळाडुंना पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदींनी दीपीका कुमारी, नीरज चोप्रा, दुत्ती चंद, मेरी कॉम यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोदीनी दीपीकाला पॅरिसमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तर नीरज चोप्रासोबत बोलताना त्याच्या दुखापतीबद्दल विचारपुस केली. तर दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्या दुत्ती चंदने बोलताना या स्पर्धेत पदक जिंकण्याचा प्रयत्न करणार असे सांगितले.

तर ऍथलीट म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या तिरंदाज प्रविण जाधवची कहाणी मोदींनी ऐकुण घेतली. येत्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजपथकाचे नेतृत्व हे मेरी कॉम आणि नीरज चोप्रा हे करणार आहे. येत्या २३ जुलैपासुन टोकियो येथे ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. ही स्पर्धा मागील वर्षी पार पडणार होती. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धा यावर्षी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!