🕒 1 min read
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १६ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा सोहळा पुण्यात पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) या वर्धापन दिन सोहळ्यात मार्गदर्शन करतील. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन सोहळा मुंबई बाहेर पार पडत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, आमच्याच लोकांना महापुरुषांना बदनाम करायचं, युवकांची माथी भडकवायची, असले उद्योग सुरु आहेत. त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची, अजून तुमचं झालं नाही, नको तिथं बोट घालायची, असं म्हणत थेट राज्यपालांना जोरदार टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच आजचं भाषण टीझर, पिक्चर २ एप्रिलला शिवतीर्थावर, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
रस्त्यावर फुगे विकणारी मुलगी बनली मॉडेल..! ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय प्रचंड व्हायरल
-
‘आमच्याकडे आमदार खासदार नसले तरी निर्माते आहेत’ – बाळा नांदगावकर
-
कोरियन मुली एवढा सुंदर का दिसतात? चला तर जाणून घेऊयात त्यांच्या ब्युटी टिप्स..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
