Share

मुंबई, अकोला, औरंगाबाद, धुळ्यात पावसाची जोरदार हजेरी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या मुळे वसई, पालघर आणि भिवंडीसह अनेक भागांत पुन्हा पाणी तुंबल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं बदलापूर गावाकडे जाणारा ब्रिटिशकालीन छोटा पूल पाण्याखाली गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातही पावसामुळे मन नदीचं पात्र फुगलं आहे. लोहारा येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अकोट-देवरी-शेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याचं वृत्त आहे.

औरंगाबाद इथलं जायकवाडी धरण ९८ टक्के भरलं आहे. सध्या धरणात १८ हजार ४६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. धरण ९९ टक्के भरल्यानंतर गोदापात्रात पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याचं जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितलं.

धुळे शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. आज सकाळी अक्कलपाडा धरणातून तब्बल १२ हजार घनफुट प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसंच वाडी शेवाडी धरणातून ३ हजार ६०० घनफुट प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!