Share

‘आज उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा रिझल्ट लागला’, नवनीत राणांची जहरी टीका

Published On: 

अमरावती : राज्यातील सहा जिल्हा परिषदांतील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. आज या जागांचा निकाल लागला. निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र, पक्षीय बलाबल पाहता भाजपनेच कुरघोडी केल्याचे दिसत आहे.. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांसाठी मतदान झाले. त्यात काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागा जिंकल्या. तर भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित १६ जागा इतर पक्षांकडे गेल्या आहेत.

या निकालावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा निकाल लागला, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले.

‘देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जातात. त्यांच्या व्यथा जाणून समजून घेतात. त्यामुळे नागरिकांनी भाजपाला साथ दिली, असे नवनीत राणा म्हणाल्या. नागरिकांनी शिवसेनेला नाकारले आहे. त्यामुळे लोकं कोणासोबत आहे हे समोर आले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल हा तर फडणवीस यांच्या मेहनतीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या बेईमानीचा रिझल्ट आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!