मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत.गोस्वामी यामुळे चांगलेच अडचणीत आल्याचे चित्र आहे.
याच मुद्द्यावरून गोस्वामी यांच्याविरोधात कॉंग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्याने स्वतः सांगितले आहे की ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असंहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे Official Secrets Act, 1923, Sec. 5 नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवार दि. २२ जानेवरी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.
अर्नब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणात एकटा अर्नब गोस्वामीच दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथेचा भंग करून गोस्वामीचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचे तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकऱणात गोस्वामीला मदत करणा-या उच्चपदस्थांवरदेखील तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीच्या पाठिंब्यामुळे चांगली कामगिरी करू शकलो : मोहम्मद सिराज
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- आयडिया-व्होडाफोन (VI) ने आणला जिओ, एअरटेलला मागे टाकणारा रिचार्ज प्लान !
- ‘बाळासाहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असताना औरंगाबादचं संभाजीनगर होत नाही हे दुर्दैव आहे’
- सिरम मधील आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबवा – मुख्यमंत्री


