Share

असा एकही दिवस नाही जेव्हा मला बाळासाहेबांची आठवण येत नाही : भुजबळ

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७वा स्मृतीदिन आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या स्मृतीदिनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी शिवतिर्थावर जाऊन आदरांजली वाहिली आहे.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, ‘असा एकही दिवस नाही की मला बाळासाहेबांची आठवण येत नाही,’ असे म्हणत भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.

तसेच यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.

दरम्यान, प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला आणि समाजकारणाला अग्रक्रम देणाऱ्या राजकारणाची सिद्धता केली. अमोघ वक्तृत्व आणि मुद्द्याला थेट भिडणारा रोखठोक स्वभाव यामुळेच बाळासाहेबांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! अस शरद पवार म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195933075508588545?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195932610540781569?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!