Share

मुंबई उच्च न्यायालयाची आज महत्वपूर्ण सुनावणी, मराठा आरक्षणाबाबत देणार अंतिम निकाल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयाकडून आज मराठा आरक्षणा संदर्भात मोठी आणि अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांचे खंडपीठ आज या प्रकरणी निर्णय देणार आहे.

आतापर्यंत मराठा आरक्षणा संदर्भात ४ याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामधील २ याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. तर २  याचिका समर्थनात आहेत. तर २२  हस्तक्षेप अर्ज देखील दाखल करण्यात आले आहेत. त्यामधील १६ अर्ज हे आरक्षणाच्या बाजूने असून ६ अर्ज विरोधात आहेत. यासाऱ्याचा समग्र अभ्यास करून उच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न हा बराच काळ प्रलंबित असून मराठा समाजाच्या नेत्यांनी १९८०  पासूनच आरक्षणाची मागणी केली होती. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्षच करण्यात आले. २००९च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचा विचार करू असे आश्वासन दिले होते. तर २०१४  साली त्यावेळी असलेले राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षणाला मंजुरी दिली. शैक्षणिक क्षेत्र आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६  टक्के आरक्षण दिले. तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले. मात्र नोव्हेंबर २०१४  मध्ये या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली.

दरम्यान मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. याचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आणि तरुणांना सरकारी नोकरीमध्ये होणार आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!