Share

चिंताजनक : राज्यात आज कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान

Published On: 

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ९११ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ४ हजार ६८७ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख ४९ हजार २७७ नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार ९९० नमुने पॉझिटिव्ह (१८.३९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १५० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३४ टक्के एवढा आहे.

तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी १३ कोटी – उपमुख्‍यमंत्री

मागील ४८ तासात झालेले १५० मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-२, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-५, मालेगाव मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-३, जळगाव मनपा-२, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१६,सोलापूर मनपा-५, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-४, जालना-५, लातूर-१, अकोला-२, अकोला मनपा-१, अणरावती-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

पंकजा मुंडेंना केंद्रात बढती की राज्यातील राजकारण संपवण्याची खेळी ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!