Share

पंकजा मुंडेंना केंद्रात बढती की राज्यातील राजकारण संपवण्याची खेळी ?

Published On: 

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. नाराज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना राज्यात प्रदेश उपाध्यक्षा करण्यात आले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे केंद्रात आणि प्रीतम मुंडे राज्यात अस चित्र पक्ष स्तरावर तरी पाहायला मिळणार आहे. यामुळे येत्या काळात पंकजा मुंडे दिल्लीच्या राजकारणात जाणार का ? यावर निमित्ताने चर्चा सुरु झाली आहे.

आता विस्तारवादाचं युग संपलं; पंतप्रधान मोदींचा चीनला थेट इशारा

गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात अनेक नेते नाराज होते. त्यामुळे ही कार्यकारिणी कशी असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान मिळणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी कार्यकारिणीच्या प्रमुख पदांमध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना डच्चू देण्यात आला आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना बढती दिली आहे की राज्यातील राजकारणातून वगळलं जातंय, अशी चर्चा राजकारणात सुरु झाली आहे. पंकजा मुंडे या मूळ हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी आणि कट्टर स्वरुपाच्या राजकारणी आहेत. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनीही खडतर हिंदुत्वावादी भूमिका निभावली होती. पण ते राजकीय पुढारी नव्हते. त्यामुळे पंकजा मुंडेंचा काहीही वापर भाजपच्या राजकारणासाठी होत नव्हता. त्यातून देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जमेनासे झाले होते. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांचा राज्यातून काटा काढला गेलाय का ? अशी चर्चा सुरु आहे.

तर, चंद्रकांत पाटील यांनी सर्व विचार करुन ही कार्यकारणी जाहीर केली असेल. पण पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची पक्ष नेतृत्व निश्चित चांगल्या पद्धतीने दखल घेईल. शेवटी राज्यात बहुमत मिळूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षात सक्षम पद्धतीने काम करुन येत्या काळात राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांची गरज लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नेत्याची योग्य ती दखल पक्षाने घेतली आहे. भविष्यकाळात ती जबाबदारी घेतील, असं मत भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी व्यक्त केलं.

भाजपची कार्यकारणी जाहीर, पंकजा मुंडे केंद्रात तर प्रीतम मुंडेंवर राज्यात मोठी जबादारी

मात्र, एकप्रकारे राज्यातून राजकीय विरोधकांना किंवा ज्यांचं आपल्यासमोर उभं राहण्याची क्षमता आहे, अशा व्यक्तींना दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. गोपीनाथ मुंडेंचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपचे नेतृत्व पंकजा मुंडे करत आहेत. त्यांचा पराभव झालेला आहे, त्यांना विधानपरिषदेत पाठवायचं नाही. मग पंकजा मुंडेंना राजकीय पुर्नवसन करण्यासाठी केंद्रातील तथाकथित मोठी जबाबदारी मिळाली तरी पंतप्रधान आणि अध्यक्ष या पदाशिवाय इतर जबाबदारीला फारसं स्थान नसतं. ते एक प्रकारचं दाखवण्यासाठी असते. त्यामुळे पंकजा मुंडेंची राजकीय बोळवण केलेली आहे हे नक्की.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!