नवी दिल्ली : वनडे संघाचा कर्णधार बनवल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) ने विराट कोहली (Rohit Sharma) बद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, विराट कोहली अजूनही या संघाचा नेता आहे आणि संघाला त्याची नितांत गरज आहे.
विराट कोहलीची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्याच्या जागी रोहित शर्माची वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोहलीने यापूर्वीच टी-20 चे कर्णधारपद सोडले होते आणि आता त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले असून रोहित शर्माने आता टी-20 तसेच वनडेच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
दरम्यान, रोहित शर्माने विराट कोहलीचे कौतुक केले असून संघात त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. एका कार्यक्रमा दरम्यान रोहित शर्मा म्हणाला, ‘विराट कोहलीसारख्या फलंदाजाची संघाला नेहमीच गरज असते. टी-20 मध्ये 50 हून अधिकची सरासरी असणे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याच्या अनुभवामुळे त्याने अनेकदा चांगली फलंदाजी केली आहे. विराट कोहली ज्या प्रकारे फलंदाजी करतो ते संघासाठी आवश्यक आहे. तो अजूनही या संघाचा नेता आहे. तसेच त्याची उपस्थिती संघासाठी खूप महत्त्वाची आहे.
विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर टी-20 चे कर्णधारपद सोडले होते आणि आता त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आहे. आता विराट कोहली फक्त कसोटी क्रिकेटमध्येच कर्णधार असेल. त्याचवेळी रोहित शर्मा वनडे आणि टी-२० मध्ये कर्णधार असेल. रोहित शर्मावर आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
महत्वाच्या बातम्या:
- एक जागा तीन दावेदार…कोण असणार एकदिवसीय संघाचा उपकर्णधार?
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- बिपीन रावत यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा कायम लक्षात राहील- शरद पवार
- ‘त्यांच्या निधनामुळे मला…’, बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक


