Share

‘आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून…’, फडणवीसांचे टीकास्त्र

Published On: 

नागपूर : काही दिवसांपूर्वी वरळीच्या गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक ३ मध्ये सिलिंडर स्फोट झाला होता. या घटनेत चार जण होरपळले. यातील काही जणांना नायर तर काही लोकांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगेश पुरी या चार महिन्याच्या बालकाचा १ डिसें. रोजी मृत्यू झाला. त्यानंतर आनंद पुरी यांचा ४ डिसें. तर विद्या पुरी यांचा काल मृत्यू झाला होता. तसेच या दुर्घटनेत एक पाच वर्षाचा मुलगा १५ ते २० टक्के होरपळला आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वरळीत हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर तसेच महापौर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांच्यावर टीका करत अशा काळात महापौर कुठे निजल्या, असे वक्तव्य केले होते. यावर पेडणेकर यांनी बुधवारी(८ डिसें.) मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात आशिष शेलार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. फडणवीस म्हणाले की,भाजपाचा कोणताही नेता आणि विशेषत: आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरु शकत नाहीत, महापौरांबद्दल तर अजिबात नाही. काल त्यांची पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट याचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी कदाचित गुन्हा दाखल झाला का हा देखील एक प्रश्न आहे.’

दरम्यान, यासंदर्भात आज(९ डिसें.)पत्रकार परिषद घेत शेलार म्हणाले की,’ही तक्रार खोटी, गुन्हा खोटा, कायदेशीर प्रक्रिया खोटी. या राज्यात पोलीस बळाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग केवढ्या मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. मी कोणत्याही महिलेबाबत, महापौरांबाबत, कोणत्याही व्यक्तीबाबत अपमानास्पद, बदनामीकारक वक्तव्य, छेडछाड किंवा कोणताही गुन्हा केलेला नाही. सातत्याने दोन दिवस वेगवेगळ्या पोलीस स्थानकात दबावतंत्र करून, सत्तेचा दुरुपयोग करून हा खोटा गुन्हा दाखल केला आहे.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!