Share

सुजय विखेंना हरवण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात ‘हा’ आहे मास्टर प्लान

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: निवडणुकीच्या तोंडावर सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला. तत्पूर्वी नगरच्या जागेसाठी विखेंनी राष्ट्रवादीकडे आग्रह धरला होता. परंतु राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला होता. भाजपा प्रवेशानंतर सुजय विखेंना पहिल्याच यादीत उमेदवारीही मिळाली. राष्ट्रवादीनेही संग्राम जगताप यांना मैदानात उतरवत सुजय विखेंना आव्हान  दिलं आहे. नगर दक्षिणमध्ये आता सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस समोर सुजय विखेंना हरवण्याच मोठं आव्हान असणार आहे,त्यामुळे ही लढत अतिशय रंगतदार होणार आहे.

पवार-विखे हा वाद नवा नाही त्यामुळे सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे २५ मार्च ला अहमदनगरच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते सुजय विखेंविरुद्ध मास्टर प्लान आखणार आहेत. नगरच्या या दौऱ्यात ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह भाजपविरोधी पक्षांशीही चर्चा करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे सुजय विखेंना टक्कर देण्यासाठी शरद पवार मैदानात उतरलेत यात काहीच शंका नाही.

काय आहे विखे पवार वाद ?

१९९१ ची लोकसभा निवडणूकीत बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद अगदीच विकोपाला गेला. कॉंग्रेसकडून या जागेवर सरळ दावा होता त्याकाळचे मातब्बर नेते बाळासाहेब विखे यांचा. मात्र अस बोलल जात शरद पवार यांनी त्यावेळी विखेंच तिकीट कापण्यात आपल सगळ राजकीय वजन वापरलं.आणि कॉंग्रेसकडून उमेदवारी दिली सोनईच्या यशवंतराव गडाख यांना. त्यामुळे बाळासाहेब विखे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले.

त्यानंतर बाळासाहेब विखे-पाटील यांनी निवडणुकीच्या काळात शरद पवार आणि यशवंतराव गडाखांनी त्यांचं चारित्र्यहनन केलं, असा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला.

शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांच्याविरोधात बाळासाहेब विखे पाटील यांनी कोर्टात पुरावे सादर केले. हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. या खटल्यादरम्यान शरद पवार यांच्यावरही कोर्टाने ठपका ठेवला तर गडाखांना सहा वर्षं निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं.

“निवडणुकीत भाषण करताना उत्तरेतील जित्राबं दक्षिणेत येतील… पैसे देतील, सायकल देतील (विखे पाटील यांचं निवडणूक चिन्ह सायकल होतं) ते घ्या पण मतं कॉंग्रेसच्याच उमेदवाराला द्या, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्यावरून आचारसंहितेचा भंग झाला. तसंच बदनामी केली या आरोपांचा खटला विखे यांनी गडाख आणि शरद पवार यांच्यावर केला. त्यावेळी कोर्टाने गडाख यांना ६ वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली होती, तर शरद पवार यांच्यावर ठपका ठेवून नोटीस काढली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!