🕒 1 min read
औरंगाबाद: मागील सरकारच्या कार्यकाळात पासून सुरू झालेल्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते नाशिक पर्यंतच्या कामाचा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला त्यावेळी नागपूर ते नाशिकपर्यंतचा महामार्ग मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल,’ असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्गाची आढावा बैठक घेण्यासाठी देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावर डेडलाइनमध्ये कामे पूर्ण करावीत, असे आदेश देसाई यांनी दिले. त्यामुळे आता लवकरच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी समृद्धी महामार्गाच्या बांधकामात काम करणारे मजूर . टाळेबंदीनंतर अनेक जण गावी गेल्याने या कालावधीत समृद्धी महामार्ग बांधकामाचा वेग थोडा मंदावला होता. परंतु आता गेल्या दोन महिन्यांपासून कामगार पुन्हा कामावर परतू लागले आहेत. त्यामुळे आता २० हजारांहून अधिक कामगार या प्रकल्पात काम करत असल्याचे हे काम अंतिम टप्प्यात आला आहे
या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्निल मोरे, सिल्लोडचे ब्रिजेश पाटील, उपअभियंता व्ही. एन. चामले, एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, शहर अभियंता एस. डी. पानझडे, नॅशनल हायवे अ;ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अजय गाडेकर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- आपल्याला केवळ सक्षम भारत नकोय तर हरित भारत हवा – उपराष्ट्रपती
- मुंबईतील २५ अनुदानित कॉलेज बंद पाडण्यापासून वाचवा- कॉंग्रेस
- हे लोकनियुक्त सरकार नसून षडयंत्रातून तयार झालेले सरकार, ह्या सरकारचा पायगुणच संकटाचा- सुजय विखे
- सत्ता टिकविण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले- राधाकृष्ण विखे
- जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या; बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मागणी


