Share

पाकिस्तानमध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी कडक सुरक्षा : पहा व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

इस्लामाबाद : टी-20 कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे. 26 जानेवारीपासून कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये कसोटी मालिकेने दौऱ्याची सुरुवात होईल. त्यापूर्वी, 16 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेचा 21 सदस्यीय संघ पाकिस्तानमध्ये पोहचला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव क्रिकेट संघ आणि संबंधित क्रिकेट मंडळे सामान्यत: आपल्या खेळाडूंना पाकिस्तान पाठविण्यास इच्छुक नसतात.

बहुतेक वेळा पीसीबीने (PCB) युएईमध्ये संघाचे सामने आयोजित केले आहेत. तथापि, अन्य देश आता पाकिस्तान खेळण्यासाठी दौर्‍याचे वेळापत्रक आखण्याच्या विचारात असल्याने हळूहळू परिस्थिती बदलत आहे. दक्षिण आफ्रिकी संघ देखील तब्बल 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर देशात दाखल झाला आहे. आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कडक सुरक्षा पुरवल्यामुळे ते प्रभावित झाले.

https://twitter.com/shamsi90/status/1350325339638136836?s=20

शनिवारी कराची येथे आल्यानंतर पाकिस्तानात कडक बंदोबस्त ठेवल्याबद्दल तबरेज शम्सीने अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यजमान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या राज्य-सुरक्षा पातळीवर यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकच्या नेतृत्वातील संघाला विमानतळावरून हॉटेलमध्ये नेण्यात आले. शम्सीने सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक करत दोन ट्वीट केले. व्हिडिओ शेअर करत स्पिनरने ट्विट केले की, “सुरक्षा कडक आहे!”त्यानंतर, पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकार्‍यांच्या हातात बंदूक असल्याचा फोटो शेअर करत आफ्रिकी क्रिकेटपटूने ‘कॉल ऑफ ड्यूटी’ असे कॅप्शन दिले. “खरी कॉल ऑफ ड्यूटी. ही मुले छोट्या बंदुकाने खेळत नाहीत आणि त्यांना कामाशी मतलब आहे!”  शम्सीने लिहिले. सध्याची देशभरातील परिस्थितीती पाहता कसोटी मालिकेच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका संघाला नियमांचे पालन करून क्वारंटाइन राहावं लागणार आहे. क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

https://twitter.com/shamsi90/status/1350325703393345536?s=20

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!