Share

अकोल्यात थरार! अपघातानंतर लागलेल्या आगीत ट्रक आणि बस जळून खाक

Published On: 

🕒 1 min read

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूरच्या राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेनंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला आहे. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

बाळापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेळद फाट्याजवळ आज दुपारी एक वाजता बाळापूरवरुन अकोलाकडे जाणाऱ्या एसटी बसची व अकोलावरुन बाळापुरकडे जाणाऱ्या कोळशाचा ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर अचानक एसटीने आणि कोळशाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. यात ट्रक आणि बस जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, अपघातात एसटी चालकाला गंभीर दुखापत झाली असून, सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाला अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर बाळापूर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  बाळापूर पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!