बीड : जिल्ह्यात मागील महिनाभरात झालेल्या अतिवृष्टी मध्ये पुराचे अभूतपूर्व संकट उभे राहिले. यातून बाहेर येण्यासाठी, तसेच शेतकरी व सर्वसामान्य जनतेला पुन्हा उभा करण्यासाठी पिक विम्याच्या भरपाई बरोबरच राज्य आपत्ती निवारण निधी च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास अतिवृष्टीची झळ बसलेले सर्व शेतकरी पात्र ठरत असून ही मदत राज्य शासनाने घोषित केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
जिल्ह्यात पूरस्थिती आणि अतिवृष्टीने झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी नूतन खासदार रजनीताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ, आमदार प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर, लक्ष्मण पवार, बाळासाहेब आजबे, विनायक मेटे इत्यादी उपस्थित होते.
पालकमंत्री मुंडे म्हणाले, जिल्ह्यातील ११ लाख ६६ हजार शेतकरी सभासदांपैकी जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे म्हणून पीक विम्याची नोंदणी केली आहे . सर्व शेतकऱ्यांना पिकविमाची भरपाई मिळावी यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात हाच या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. याव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही त्यांनाही नुकसानीची सरसकट मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
नुकसानीच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सर्व शासकीय व कार्यान्वयन यंत्रणांनी वेगवान काम केले पाहिजे यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम अशा ज्या यंत्रणेचा निधी वापरता येईल तो वापरावा, कागदोपत्री प्रक्रियेत वेळ न घालवता तातडीने कामे सुरू करावीत, असे निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
