मुंबई :मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करण्यात आली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, आर्यन खानसोबत व्हायरल झालेल्या फोटोत दिसणाऱ्या मनिष भानुशाली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही फोटो आहेत. त्यामुळे एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि भानुशालीचा संबंध काय?, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण https://t.co/ngDLcs3jyh
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 6, 2021
तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल. मनिष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्याच्या प्रोफाईलवर भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही भाजप नेत्यांबरोबर फोटो आहेत. एनसीबीने सांगावं त्यांचा आणि मनिष भानुशालीचा संबंध काय?, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

