Share

‘तीन नेते म्हणजे शिवसेना नाही; ‘तेव्हा’ का ओरड केली नाही?’

Published On: 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपने अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काहींवर भ्रष्टाचाराचे तर काहींवर महिला अत्याचारांचे! दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आदी नेत्यांविरोधात ईडी तपास करत असून छापेमारी देखील करत आहे.

सरकार अस्थिर करण्यासाठी ईडी, सीबीआय अशा केंद्रीय संस्थांचा भाजप दुरुपयोग करत असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. तर, भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावत मंत्री आणि नेते भ्रष्टाचारी असल्याचा दावा केला आहे. ईडीच्या रडारवर प्रामुख्याने शिवसेनेचे परब, अडसूळ आणि भावना गवळी या असल्याने भाजप शिवसेनेनं साथ सोडल्याचा बदला घेतेय का? असा सवाल केला जातोय.

यावर भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना यावर भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर, नेत्यांवर ईडीची होणारी कारवाई हा यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांवर ईडीच्या कारवाया झाल्या आहेत. तेव्हा का ओरड केली नाही? असा सवाल करतानाच तीन नेते म्हणजे शिवसेना नाही, असं भाष्य मुनगंटीवार यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!